Sarkarnama Banner - 2021-07-13T105343.495.jpg
Sarkarnama Banner - 2021-07-13T105343.495.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

शिवसेनेला मोठे खिंडार..बड्या नेत्याचा आज काँग्रेसमध्ये प्रवेश

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हा संपर्क प्रमुख,  ठाणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम आरोग्य समितीचे सभापती गटनेता सुरेश गोपीनाथ म्हात्रे (बाळा मामा) आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. Shivsena leader Suresh Mhatre join congress Today

दादर येथील टिळक भवनात काँग्रेसच्या बैठकीत म्हात्रे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, बाळासाहेब थोरात आदींच्या उपस्थितीत हा म्हात्रे यांचा प्रवेश होणार आहे.

बाळा मामा म्हात्रे (Suresh Mhatre) यांनी शिवसेना पक्ष सदस्यत्वासह आपला ठाणे जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांच्याकडे दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शिवसेनेला (Shivsena) मोठे खिंडार पडणार आहे. आगामी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच म्हात्रे यांनी हा राजीनामा दिला असल्याची चर्चा आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेनेला ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठे खिंडार पडणार असल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे.  सुरेश म्हात्रे यांनी 2014 ची लोकसभा निवडणूक मनसे कडूनलढविल्या नंतर 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकी दरम्यान भाजपा उमेदवार कपिल पाटील यांच्या विरोधात उघड भूमिका घेतल्याने सेना पक्षश्रेष्ठींनी सुरेश उर्फ बाळा मामा म्हात्रे यांच्या वर कारवाई करत तब्बल दोन वर्षे त्यांना निर्णय प्रक्रियेपासून बाजूला ठेवून कोणतीही जबाबदारी सोपविली नव्हती.

महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न संपल्याचा केंद्रीय मंत्र्यांना साक्षात्कार 
बंगळूर : बिदर भागातील मराठी मतांवर निवडून आलेले खासदार व नूतन केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांना मंत्रिपदावर जाताच महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न संपल्याचा साक्षात्कार झाला आहे. येथील एका इंग्रजी वृत्तपत्राने घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी सीमावाद एक संपलेला अध्याय असल्याचे म्हटले आहे. 
Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT